Monday, 27 October 2025

नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज

 नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज



                - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

·         इंडिया मेरीटाईम वीक २०२५ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. २७ : मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून इंडिया मेरीटाईम वीक- २०२५ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्कोगोरेगाव येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक- २०२५ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरेजहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवालगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतओडिशाचे मुख्यमंत्री मोहन शरण मांझीकेंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारआणि केंद्रीय सचिव विजय कुमार, आदी मान्यवर उपस्थित होते.

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने आज जगभरातील सागरी तज्ज्ञउद्योगपती आणि  प्रतिनिधी भारतात एकत्र आले असल्याचे सांगूनकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, गेटवे ऑफ इंडिया’ आता गेटवे ऑफ द वर्ल्ड’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताचा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. सागरी क्षेत्र देशाच्या जीडीपीत ६० टक्क्यांहून अधिक योगदान देते. पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारत सागरी व्यापारात अग्रस्थानी होता. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिद्ध करत आहे. सागरसागरमालागतिशक्ती आणि समुद्रयान यासारख्या प्रकल्पांमुळे सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळाले आहे. भारत जहाजबांधणीत जगात पाचव्या क्रमांकावर असून नवीन बंदरांचीही उभारणी वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi