मंत्री राणे यांनी सांगितले की, नव्या जहाज बांधणी धोरणामुळे उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणूक करणे आणि प्रकल्प वेळेत उभारणे यासाठी शासन सर्व स्तरावर मदत करेल. यासाठी एक गट तयार करण्यात आला आहे. जहाज बांधणी उद्योग हा क्लस्टर स्वरूपात विकसित केला जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांना सर्व सोयी उपलब्ध होतील. तसेच जहाज बांधणीसाठी उभारण्यात येणारी बंदरे रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडली जाणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी उद्योजकांनी राज्यात सुरू असलेल्या विकास कामांचे कौतुक करून बंदरांच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या धोरणांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच बंदर विकास क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शवली.
No comments:
Post a Comment