Friday, 17 October 2025

सुधार माझी शाळा अभियान,स्वरूप,कालावधी ,उद्दिष्टे,

 अभियानाची उद्दिष्टे

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचा कालावधी

या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी असेल. 3 नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. तर, 31 डिसेंबर 2025 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल.

अभियानाचे स्वरूप

अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा- 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- 101 गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी- 61 गुण असे एकूण 200 गुण असतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi