Friday, 17 October 2025

देशातील युवकाकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच

 देशातील युवकाकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. देशात कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता आजची पिढी कौशल्य प्राप्त करून पुढच्या युगातील तंत्रज्ञानाची पिढी घडवेल असा विश्वास वाटतो. मात्र कौशल्यासोबत संवेदनशील राहून समाजासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहेअसे  राजनाथ सिंह म्हणाले.

स्नातकांना दीक्षांत संदेश देतांना ते म्हणालेपदवी प्राप्त करून विद्यापीठाच्या बाहेर पडणाऱ्या स्नातकांसाठी संपूर्ण विश्व आता एक नव्या विद्यापीठाप्रमाणे असेल. या स्नातकांनी भविष्यातील चिंता न करता व्यापक दृष्टीकोन बाळगावा. संकुचित विचारांनी जीवनात सुख आणि आनंद मिळविता येत नाही. स्नातकांचे यश हे समाजाचा सहयोगसंस्कार आणि पाठिंब्याचा परिणाम आहे. त्यामुळे या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगणे गरजेचे आहे. कुशल बुद्धीच्या आधारे  सतत कार्यरत राहून कौशल्यसंकल्प आणि परिश्रमाने स्नातक नव्या युगाची पायाभरणी करतीलअसा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi