Wednesday, 29 October 2025

जनगणना-२०२७ च्या पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

 जनगणना-२०२७ च्या  पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

 

मुंबईदि. २८ : भारत सरकारने २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. या जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणूनत्याची पूर्वचाचणी दि. १० ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  केली जाणार आहे. जनगणनेकरिता नियुक्त केलेले प्रगणक व पर्यवेक्षकजे माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरे व कुटुंबाला भेट देतीलत्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन संचालक डॉ. निरुपमा जे. डांगेजनगणना संचालनालय-महाराष्ट्रमुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

 

जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घर यादी व घर गणना हा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर२०२६ या कालावधीत पार पडणार आहे. लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी२०२७ मध्ये पार पडणार आहे. ही जनगणना अधिनियम१९४८ च्या तरतुदीनुसार ही जनगणना केली जाते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi