Saturday, 27 September 2025

शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम समावेशाची अंमलबजावणी करावी

 शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम समावेशाची अंमलबजावणी करावी

-         शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबईदि. २६: राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ यांच्यामध्ये 'व्यवसाय शिक्षणाची नवकल्पनामांडली आहे. सन २०२५-२६ या वर्षी इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये कार्य शिक्षण या विषयांतर्गत कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून टप्प्या-टप्प्याने इयत्ता दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत विभागाने अंमलबजावणी करावीअसे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

 

शालेय अभ्यासक्रमात कृषी अभ्यासक्रम समाविष्ट करण्याबाबत मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजनतर दूरदृश्य प्रणालीद्वारे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकरसहसंचालक हारून अत्तरराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे वरिष्ठ प्राध्यापक आर. एन वाकडे सहभागी झाले.

 

राज्यमंत्री डॉ भोयर म्हणालेराष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० अनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२५ चे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. या नवीन अभ्यासक्रमामध्ये वय वर्षे तीन ते आठ मधील विद्यार्थ्यांना कार्य २०२४ मध्ये बालकांचे कार्य शिक्षण या विषयांतर्गत पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम, कौशल्याबरोबरच २१ व्या शतकातील महत्त्वपूर्ण कौशल्येतसेच कृषीपर्यटन व्यावसायिकतेचा पाया याच पायाभूत स्तरापासून घातला जाईलअशा उपक्रमांची मांडणी करावी.

 

विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती रुजावी यासाठी स्थानिक सणसमारंभपरंपराकलापिकेभौगोलिक रचनाउपलब्ध साधन सामग्री यांचाही विचार कार्यशिक्षण विषयाच्या उपक्रमाची मांडणी करताना करावा. भारतातील शेतीचे महत्त्वकृषी क्षेत्रातील गुंतवणूकशेतीचे लोकजीवनातील विशेष स्थान या सर्व बाबींचा विचार करता नव्या पिढीची नाळ कृषी क्षेत्राशी जोडण्यासह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विस्तार होण्यासाठी मातीपाणीनैसर्गिक संसाधनेवनस्पतीस्थानिक पशुपक्षी या विषयातील नवीन उपक्रम सुचविण्यात यावेतअशा सूचना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.

 

 इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परसबागसेंद्रिय शेतीतृणधान्य उत्पादनअन्न प्रक्रियाकृत्रिम बुद्धीमत्ताबांबूचा वापरपाळीव प्राण्यांचे पोषणकुक्कुट पालनपर्यटन आणि आदरातिथ्यजल व्यवस्थापनासाठी पाण्याचे लेखापरीक्षणजैवविविधता नोंदणीइंधनविरहीत स्वयंपाक इत्यादी विषय उपलब्ध करून देण्यात यावेत. शेतीसारख्या परंपरागत विषयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित साधनांचा उपयोग कसा करावा याचा अभ्यासक्रमात सहभाग असावाअसेही राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi