Monday, 22 September 2025

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरिता खुले होणार

 मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंत

प्रवाशांकरिता खुले होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

मेट्रो प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रो मार्ग-४ व ४ अटप्पा-१गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न

 

ठाणे, दि. २२ (जिमाका) :- मेट्रो ४ आणि ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६च्या ऑक्टोबरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतीलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मेट्रो मार्ग ४ (वडाळाकासारवडवली) व ४ अ (कासारवडवलीगायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव- घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलीत्यावेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi