Sunday, 28 September 2025

सत्काराला उत्तर देताना डॉ.आमटे म्हणाले,

 सत्काराला उत्तर देताना डॉ.आमटे म्हणालेबाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. त्यांचे हे कार्य जगभरात पोहोचले. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात आल्यावर आम्ही दोन्ही भावांनी आनंदवनाचे कार्य पुढे नेण्याचे निश्चित केले. भामरागड येथे बाबांसोबत भेट दिल्यानंतर आदिवासी जनतेतील कुपोषणत्यांच्या समस्या पाहून त्यांच्या उत्थानाच्या कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला. त्यातूनच लोकबिरादरी प्रकल्पाची कल्पना पुढे आली. लोकांच्या सहकार्य आणि विश्वासातून हे कार्य पुढे गेले. आज अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात या परिसरातील तरुण पुढे गेले आहेत. गेली 52 वर्षे हे जनसेवेचे हे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  स्व.दाजीसाहेबांनी राजकारणासोबत समाजकारण करताना समाजसेवेचा वारसा पुढे नेला असेही डॉ.आमटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi