Saturday, 27 September 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना

लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

            धुळेदि. २७ : आरोग्यशिक्षणशेतीजलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचेत्यांच्यातील आत्माभिमान जागृत करण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याचे काम डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. त्यामुळे जीवनाचे समर्पण लोकसेवेसाठी दिलेल्या स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नावाने असलेला पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहेअसे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

लोकनेतेमाजी मंत्री स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन व लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारार्थीज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीयपणन मंत्री जयकुमार रावलग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेखासदार स्मिता वाघडॉ. शोभा बच्छावमंदाकिनी आमटेलता पाटील,  माजी आमदार कुणाल पाटीललोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेबाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा विचार देशभर पोहोचविला. जिथे जाण्यासाठी रस्ताही नव्हताअशा हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी मंदाकिनी आमटे यांनीही डॉ. प्रकाश आमटे यांना समर्थ साथ दिली. आमटे परिवारातील तिसरी पिढी या प्रकल्पांसाठी कार्यरत आहे. अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. आमटे यांनी अविरतपणे हा प्रकल्प सुरू ठेवला आहे आणि पुढेही सुरू रहावाअशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi