Wednesday, 24 September 2025

राज्यात दहावा 'आयुर्वेद दिवस' साजरा

 राज्यात दहावा 'आयुर्वेद दिवससाजरा

 

मुंबईदि. २३ : लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेदया संकल्पनेखाली राज्यात दहावा 'आयुर्वेद दिवस२३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालयआरोग्य भवनमुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी पंतप्रधानांचा संदेश वाचण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिवडॉ. निपुण विनायकआरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकडॉ. कादंबरी बलकवडेतसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

या दिनानिमित्त पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि राष्ट्रीय आयुष अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद वनस्पती माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या वनस्पतीची माहिती मोबाइलवर उपलब्ध होत होती. 

राज्यातील सर्व आरोग्य आणि आयुष संस्थाएकात्मिक आयुष रुग्णालयेजिल्हा रुग्णालयेग्रामीण रुग्णालयेप्राथमिक आरोग्य केंद्रेआयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष) आणि आयुर्वेद दवाखान्यांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्याख्याननिबंध आणि चित्रकला स्पर्धावृक्षारोपणआणि 'स्वस्थ नारी सशक्त परिवारअंतर्गत आयुष शिबिरे व योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi