Thursday, 18 September 2025

त्रिभाषा सूत्रांची राज्यात विविध ठिकाणी जाऊन जनमताचा कानोसा

 राज्यात विविध ठिकाणी जाऊन जनमताचा कानोसा घेण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांसह संभाजीनगर (8 ऑक्टोबर)नागपूर (10 ऑक्टोबर)कोल्हापूर (30 ऑक्टोबर)रत्नागिरी (31 ऑक्टोबर)नाशिक (11 नोव्हेंबर)पुणे (13 नोव्हेंबर)सोलापूर (21 नोव्हेंबर) आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत भेट देणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी ज्यांना या विषयाबाबत आपले म्हणणे मांडायचे असेल अशा सर्वांकडून समिती त्यांच्या भावना समजून घेईल.

इतर राज्यात त्रिभाषा सूत्रांची कशी अंमलबजावणी सुरू आहेत्याचीही समिती माहिती घेणार आहे. तथापिराज्यात सर्वांशी चर्चा केल्यानंतर समिती 5 डिसेंबर पर्यंत आपला अहवाल शासनास सादर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील दोन कोटी 12 लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा समितीचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi