Tuesday, 23 September 2025

ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार

 ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 

राज्याच्या प्रगतीला हातभार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन

 

मुंबईदि. 23 : महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टरक्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ॲमेझॉन गुंतवणूक करीत आहे. यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार लागेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी अमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीच्या मुंबईतील डेटा सेंटर चे दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीने राज्यात पहिल्या टप्प्यातील ८.३ बिलियन डॉलर गुंतवणुकीचा या उपक्रमाद्वारे शुभारंभ केला आहे. यावेळी मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (पब्लिक पॉलिसी) शाखेचे जागतिक उपाध्यक्ष मायकल पुंकेदक्षिण आशिया व भारताचे अध्यक्ष संदीप दत्ताआशिया पॅसिफिक क्षेत्राचे संचालक विक्रम श्रीधरनकंपनीच्या भारतातील पायाभूत सोयी सुविधा क्षेत्राचे संचालक आदित्य चौधरीतसेच गायत्री प्रभूशुभंकर दासरीना मरांडा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi