Saturday, 27 September 2025

महानगरपालिकांच्या वॉटर हार्वेस्टिंग नोंदींचे महत्त्व

 महानगरपालिकांच्या वॉटर हार्वेस्टिंग नोंदींचे महत्त्व


महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झालेल्या वॉटर हार्वेस्टिंग कामांबाबतही बैठकीत चर्चा झाली. राज्यात मोठ्या प्रमाणावर काम पूर्ण झाले असले तरी त्याची योग्य नोंदणी अथवा गणना न झाल्यामुळे इतर राज्यांना मिळणारे पुरस्कार महाराष्ट्राला मिळत नाहीत, अशी खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून महानगरपालिकांच्या समन्वयाने सर्व वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांची गणना करावी, असे यावेळी सांगण्यात आले.


प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षण


प्रगणनेच्या कामासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रगणक म्हणून नेमण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांनी आधार व बँक खात्याशी संबंधित माहिती जमा करावी. तसेच मनुष्यबळ नेमून, प्रशिक्षण देऊन वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या.


केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कामे करावीत.


केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसारच ही प्रगणना राबविण्यात येत असून सर्व यंत्रणांनी गांभिर्याने कामाला लागावे. लघु सिंचन व जलसाठा योजनांच्या प्रगतीची सविस्तर माहिती गोळा करून भविष्यातील धोरण ठरविण्यास ही प्रगणना उपयोगी ठरेल.


००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi