Saturday, 20 September 2025

मिहान मध्ये सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला 223 एकर जमीन : 12,780 कोटींची गुंतवणूक

 मिहान मध्ये सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला

 223 एकर जमीन : 12,780 कोटींची गुंतवणूक

सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (एसडीएएल) या देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्प्लोजिव व इनिशिएटिंग सिस्टीम्स उत्पादक व निर्यातदार कंपनीला मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील 223 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. एसडीएएलने डावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाशी याबाबतचा सामंजस्य करार केला होता. या करारानुसार कंपनी नागपूरमध्ये अँकर मेगा डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्प’ उभारणार असूनयामध्ये 12,780 कोटी रुपयांची गुंतवणूक व सुमारे 6,825 थेट रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे कंपनी 660 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट व डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारणार आहे. यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे 875 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मिहानमध्ये संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील गुंतवणुकीला नवे बळ मिळूननागपूर व विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi