प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत ३६ जिल्ह्यांचे जिल्हा नोडल अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरच्या मुख्य सेविकांचे मॅपिंग १०० टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षासाठी ४० हजार नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित उद्दीष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ वर्षासाठी ५ लाख ७० हजार उद्दिष्ट दिले असून, ते कालमर्यादेत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी योजनेअंतर्गत असेलल्या नियमांची पूर्तता आणि प्रलंबित महिला लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच २०१७ पासून ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आल्या नाहीत, अशा महिलांपर्यंत अंगणवाडी महिला अथवा आशा वर्कर यांच्या सहायाने लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून राज्यात ही योजना राबविण्यात येत होती. त्यांनतर २०१७ पासून ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविली जात होती. २०१७ पासून आजतागायत ४६ लाख २९ हजार ११९ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.
जिल्ह्यांच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत ३६ जिल्ह्यात, ५५३ प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ३,८९९ बीट लेवलच्या मुख्य सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. मॅपिंगचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच अंगणवाडी स्तरावरील मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment