विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी
आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १३ : जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. विकसित भारत सोबतच विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यात येत आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक असून यामध्ये कंपनी आपले योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
लोढा वर्ल्ड टॉवर येथील आयबीएम कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन (माहिती व तंत्रज्ञान) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन - नैनुटीया, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, आयबीएम कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे महाव्यवस्थापक हान्स डेक्कर, व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल उपस्थित होते.
No comments:
Post a Comment