Thursday, 14 August 2025

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाच्या दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि दिनांक ११ मार्च, १९९८ च्या

 राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबडी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.


राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाच्या दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि दिनांक ११ मार्च, १९९८ च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी, राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.


स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/ पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi