Thursday, 28 August 2025

व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे

 व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठक

 

मुंबईदि. २५ : राज्याला २०४७ पर्यंत 'विकसित महाराष्ट्रकरण्यासाठी अल्पकालीनमध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे. भविष्यामध्ये कुठलीही योजनाउपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता आले पाहिजेअसे व्हिजन डॉक्युमेंट पथदर्शी ठरावेअशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

सह्याद्री अतिथिगृह येथे विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वालमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेध्येय निश्चित असल्यानंतर ध्येयप्राप्ती करण्याचा मार्गही प्रशस्त होतो. त्या दृष्टिकोनातून विकसित महाराष्ट्र ध्येयपूर्तीसाठी या 'व्हिजन डॉक्युमेंट'च्या माध्यमातून हा मार्ग तयार होत आहे. राज्याला केवळ देशातच नाही,  तर जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी या 'व्हिजन डॉक्युमेंटमधील उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक विभागाने ठेवलेली ध्येय निश्चिती प्राप्त होण्यासारखी आहे. यासाठी यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञाननवनवीन संकल्पना आणि या क्षेत्रातील  जगातील सद्यस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi