सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालयासाठी
१६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव सादर करावा
- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २६ : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे,कृषी विभागाचे प्रधानसचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल,दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment