Sunday, 17 August 2025

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 18-19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज pl share

 कोकणमुंबई महानगर प्रदेशआणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 18-19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढनदी-नाल्यांना पूरआणि दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

 

मुंबईदि 17: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकणमध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर)मुंबई महानगर प्रदेशआणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हेनाशिकपुणेसातारासांगलीकोल्हापूरपालघरठाणेउर्वरित मुंबई महानगरसोलापूरधाराशिवआणि लातूर जिल्ह्यांचा काही भाग यांचा समावेश आहे. या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.  

 

या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात दरड कोसळणेआणि सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकतेज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावेअसे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi