धारावी पुर्नविकासात स्थानिकांना आहे त्या ठिकाणी घरे देणार*
धारावी पुर्नविकास प्रकल्पात झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन धारावीमध्येच केले जाणार आहे आणि उद्योजकांना त्याच ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोणतीही जमीन अदानींना देण्यात आलेली नाही, ही जमीन ‘डीआरपी’ला देण्यात आली आहे. यामध्ये छोट्या उद्योजकांना उत्तम व्यवस्था निर्माण करुन संघटित क्षेत्रात आणणार आहे. तसेच टॅक्ससाठी पुढील पाच वर्ष टॅक्स हॉलिडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
· नवी मुंबई येथे पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे स्वतंत्र कॅम्पसेस उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये जवळपास 10 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ महाराष्ट्रात येत आहेत.
· प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्याला ३० लाख घरे मंजूर झाली आहेत.
· राज्यात १३,५६० पदांसाठी पोलीस भरती होणार आहे.
· मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाली आहे.
· वाढवण बंदराच्या माध्यमातून व्यापारी वाहतूक, निर्यात-विकास आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
· राज्यातील शालार्थ आयडी प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी केली जाणार आहे.
· राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही आरोपी जामिनावर सुटतात. अशा प्रकरणांमध्ये 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती.
No comments:
Post a Comment