Sunday, 13 July 2025

मुम्बई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पउपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,

 उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीमिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असूनहा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच  इंधनाचीही बचत होईलप्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व  राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्री गायकवाड यांनी  प्रकल्पाविषयी माहिती दिली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi