हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे सकारात्मक बदल होतील
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निवडक कृषी वस्तूंच्या हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे (Hedging and Options Trading) अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. उदाहरणार्थ, पेरणी करताना जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पिकाच्या भविष्यातील विक्री किमतीबद्दल अनिश्चितता वाटत असेल, तर तो ऑप्शन ट्रेडिंगचा वापर करून एक विशिष्ट किंमत निश्चित करू शकतो. यामुळे, बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी त्याला एक किमान सुरक्षित किंमत मिळते. हेजिंगमुळे अनपेक्षित बाजार बदलांपासून संरक्षण मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल अधिक खात्रीशीर नियोजन करता येते. परिणामी, शेतकरी अधिक स्थिर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित राहतात आणि त्यांच्या शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील.
शेतकऱ्यांना याबाबत अधिक माहिती कुठे मिळेल
शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs) व शेतकरी यांना हेजिंग डेस्कबद्दल माहिती व संपर्कासाठी पुढील क्रमांक आहेत. हेजिंग डेस्क (Hedging Desk) साठी संपर्क प्रकल्प अंमलबजावणी कक्ष - कृषी (स्मार्ट प्रकल्प) कार्यालाय पुणे येथील संपर्क पुढीलप्रमाणे आहेत. निविष्ठा व गुणनियंत्रण तज्ज्ञ बाबासाहेब जेजुरकर, मो. ९४०५००२८००, पिक विश्लेषक डॉ. ब्रम्हानंद देशमुख मो. ९५६१४२१५०९, एसीडीईएक्स आणि एनआयसीआर येथे (NCDEX - NICR) चे संपर्क- जोखीम निवारण व हेजिंग डेस्कचे प्रमुख सल्लागार नीरज शुक्ला मो. ९३२३६१४६२६, रिस्क अॅनालिस्ट - जोखीम निवारण व हेजिंग डेस्क गौतम आठवले मो. ९४२०४१९४७०, निधि मिश्रा मो. ९०२९३९१८०६ संपर्कासाठी ई मेल आयडी- hedgingdesk.smart@gmail.com आहे येथे हेजिंग डेस्कच्या अनुषंगाने याबद्दल अधिक माहिती मिळेल. एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या https://www.ncdex.com या संकेतस्थळावर about us मध्ये हेजिंग डेस्क बद्दल व प्रशिक्षणाविषयी, हेंजिंग डेस्क जनजागृतीपर माहिती देखील उपलब्ध आहे.
0000
No comments:
Post a Comment