Tuesday, 17 June 2025

जिल्ह्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यास सकारात्मक

 जिल्ह्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यास सकारात्मक

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

जिल्ह्यामध्ये 735 शासकीय शाळा असून या शाळांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

वाढवण बंदरामध्ये रोजगार मिळण्यासाठी जो अभ्यासक्रम आवश्यक आहे ते सर्व अभ्यासक्रम विभागामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे श्री .लोढा यांनी सांगितले.

 आदिवासी विकास विभागा अंतर्गत मोखाडा येथील शासकीय माध्यमिक शाळागुहिर ता. वाडा येथील शासकीय माध्यमिक शाळा या नूतन इमारतीचे आणि रायतळे व आपटाळे ता. जव्हार येथील प्रधानमंत्री जनमन अंतर्गत बहुउद्देशीय केंद्राचे आभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.  .

 यावेळी कौशल्य व रोजगार संबंधी उपक्रम राबविण्याकरिता कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता विभाग आणि वाढवण पोर्ट प्रा. लि. यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सवलतीच्या व्याजदरात डायमेकर क्लस्टर साठी जे. एन. पी. ए. (JNPA) आणि युनियन बैंक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेंतर्गत सवलतीच्या व्याजदरात निधी उपलब्ध करून देणारे निधीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत कस्टम डॉक्युमेंटेशन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

 यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थीना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता विभाग आणि कॉनफेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीजयांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पालघर जिल्हा अंतर्गत शासकीय आयटीआय मधील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व ब्लू स्टार प्रा. लि. औद्योगिक आस्थापने दरम्यान सामंजस्य करार करण्यात आले तसेच वसई-विरार शहर महापालिकाअंतर्गत सर डी. एम. पेटिट रुग्णालय येथील विस्तारित इमारतीचा आभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले.मीरा भाईंदरवसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त परिमंडळ 3विरार कार्यालयसहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग कार्यालयवाहतूक शाखा विरार विभाग कार्यालयभरोसा सेल वसई-विरार कार्यालयविशेष शाखा वसई विरार कार्यालयदळणवळण व तंत्रज्ञान विभागवसई विरार कार्यालय यांचे आभासी पद्धतीने मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi