Tuesday, 17 June 2025

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

 रत्नागिरीपुणे घाटसातारा घाटकोल्हापूर घाटसिंधुदुर्ग जिल्ह्यांना

पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबईदि. १७ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरीपुणे घाटसातारा घाटकोल्हापूर घाटसिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमीमुंबई शहर ६२.९ मिमीरायगड ५४.१ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७रायगड ५४.१रत्नागिरी ४७.७सिंधुदुर्ग १२.७,  पालघर ४९.७नाशिक ७.७धुळे ७.१नंदुरबार ४जळगाव ६.७अहिल्यानगर १.१पुणे ११.९सोलापूर ०.९सातारा १९.७सांगली ६कोल्हापूर १७.८छत्रपती संभाजीनगर ०.६जालना ०.१बीड ०.लातूर ०.१धाराशिव १.६नांदेड ३.६परभणी १.७हिंगोली ३.६बुलढाणा ३.५अकोला ८.७वाशिम ८.५अमरावती ९.४यवतमाळ ८.७वर्धा ७.६नागपूर ०.९गोंदिया ०.२चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या  महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी,  स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहेअशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi