Friday, 27 June 2025

महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

 महिला कलाकारांच्या रंग मल्हार’ प्रदर्शनाचे

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

 

मुंबईदि. २६ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या रंग मल्हार’ या विशेष पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते 27 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अकादमीच्या कलादालनात होणार आहे. हे प्रदर्शन १० जुलैपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

महाराष्ट्रगुजरातमध्यप्रदेशतेलंगणाराजस्थान या राज्यांसह जर्मनीलंडन आणि दुबई येथील महिला कलाकारांच्या कलाकृतींचा या प्रदर्शनात सहभाग आहे. चित्रकलाशिल्पकलाछायाचित्रणवस्त्रकलाटेपेस्ट्री आणि कॅलिग्राफी अशा विविध माध्यमांतील कलाकृतींचे दर्शन यातून घडणार आहे.

ज्येष्ठ कलाकार मंगल पाडेकरनीलिमा कढे आणि शुभा वैद्य यांच्यासह सुप्रिया अंबर (जबलपूर)दिपाली मेहेरभावना सोनवणेअलोका बॅनर्जीहिरल भगतजयालक्ष्मीदीपा कुलकर्णीकंचन टोडीकरिष्मा वाधवासमीक्षा जावळेस्मिता राणेतेजस्विनी चाफेकरसुषमा अदातेस्नेहा वऱ्हाडेयशश्री शीरधनकर यांसारख्या विविध माध्यमांतील मान्यवर कलाकार प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. माउंटन इन मॉन्सून’ ही अलोका बॅनर्जी यांची टेपेस्ट्रीहिरल भगत यांचे कॅलिग्राफीतील काम आणि विविध ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज विशेष आकर्षण ठरणार आहेत. स्वरंग या संस्थेने प्रदर्शनास सह- प्रायोजकत्व दिले आहे.

रसिकांनी या अनोख्या कला अनुभूतीला अवश्य भेट द्यावीअसे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रदर्शन : रंग मल्हार, स्थळ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवीमुंबई, कालावधी : २७ जून ते १० जुलै २०२५, वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७, प्रवेश : सर्वांसाठी विनामूल्य.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi