Thursday, 26 June 2025

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

 महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

३० जूनपासून मुंबईत

 

मुंबईदि. २६ : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै २०२५ या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेउच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटीलमाहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजन,विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  विधानसभा सदस्य सर्वश्री दीपक केसरकरभास्कर जाधवनितीन राऊतजितेंद्र आव्हाडअमीन पटेलविधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी  कामकाजाची माहिती दिली.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi