Monday, 16 June 2025

राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

 राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

 

मुंबई, दि.16 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे डॉ. फिरोदिया यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.

 

कुमारगुरू इन्स्टिट्यूशन्सकोईम्बतूर यांनी संस्थापक तथा उद्योगपती डॉ. एन. महालिंगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षणउद्योगसमाजसेवा इत्यादी क्षेत्रांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सन २०१४ साली या पुरस्काराची स्थापना केली होती.

 

यावेळी कुमारगुरु इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष बी. के. कृष्णराज वानवरायारउपाध्यक्ष एम. मणिकमकार्याध्यक्ष शंकर वानवरायारएम.बालसुब्रमण्यम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi