Monday, 2 June 2025

गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार

 गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील


नवनिर्मात्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह


मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा


 


मुंबई, दि. २ : महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस गोलमेज बैठकीत बोलत होते.


महाराष्ट्रात या क्षेत्रातील निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक स्वरुपात रूपांतर करून त्यांचे ‘आयपी’ (बौद्धिक संपदा) तयार करणे, आणि त्या ‘आयपी’चं संपूर्ण भारतात व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करणे ही कल्पना उत्कृष्ट ठरेल.


मराठीचा कंटेंट जागतिक स्तरावर नेणार


ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक मराठी कंटेंट जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मराठी कंटेंट क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi