Thursday, 26 June 2025

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

 सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग;

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा


              मुंबईदि. २६ :  रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने  इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
             कोकण किनारपट्टीला आज २६ जून २०२५ रोजीही सायंकाळी ५-३० पासून रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे
पर्यंत ३.४ ते ४.२ 
मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) वाशिम जिल्ह्यात ८८.५ मिमी पाऊस झाला आहे. तर यवतमाळ  जिल्ह्यात ७०.३,  नांदेड जिल्ह्यात ६०.३ मिमीहिंगोली ४७.१आणि बुलढाणा जिल्ह्यात ३५.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २६ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ५.७रायगड ६.८रत्नागिरी १०.७,  सिंधुदुर्ग १६.६पालघर ५नाशिक ११.४धुळे ७.२नंदुरबार ११.७जळगाव १०.२अहिल्यानगर ०.२पुणे ३.३सोलापूर ०.९,  सातारा २.३,  सांगली १.९,  कोल्हापूर १५.१छत्रपती संभाजीनगर २६.२जालना २४.१बीड १.२लातूर ४.१धाराशिव ०.३नांदेड ६०.३हिंगोली ४७.१बुलढाणा ३५.४अकोला २०.९वाशिम ८८.५अमरावती ९.८यवतमाळ ७०.३वर्धा १९.७नागपूर ३०.८भंडारा १३.गोंदिया ५.८चंद्रपूर १५.१ आणि गडचिरोली जिल्ह्यात ९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई उपनगर  जिल्ह्यात  झाड पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. पाण्यात बुडून कोल्हापूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून एक व्यक्तीचा मृत्यूसातारा जिल्ह्यात नदीत पडून एका व्यक्तीचा मृत्यूयवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू आणि पाण्यात वाहून गेल्याने नाशिक जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi