Monday, 23 June 2025

माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

 माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

                                             मंत्री शंभूराज देसाई

 

        मुंबई, दि.१६ : माजी सैनिकांच्या विविध मागण्या लक्षात घेता सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पावनगड या निवासस्थानी आयोजित बैठकीत माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी माजी सैनिक कल्याण विभागाचे  संचालक कर्नल दीपक ठोंगेउपसंचालक पुनर्वसन ले.कमांडर ओंकार कापलेअखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदचे कोकण  प्रांतचे अध्यक्ष मेजर विनय देगांवकरराज्य सचिव वीरेंद्र महाजनी, एअर मार्शन प्रदीप बापटब्रिगेडियर अजित श्रीवास्तव उपस्थित होते.

           माजी सैनिकांची जिल्हा कल्याण समिती स्थापन करून या समित्यांमध्ये आखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेच्या सदस्यांना घेणे, माजी सैनिकांना विविध शासकीय सर्वेक्षणमतदार नोंदणीतसेच मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणेनिवृत्त अग्निवीर सैनिकांसाठी शासकीय व निमशासकीय खात्यामध्ये १० टक्के नोकरीमध्ये आरक्षण जाहीर करणे, शांतीकाळात आंतकवादी निरसन कार्यात शहिद झालेल्या सैनिकांच्या विधवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत अनुकंपा योजनेनुसार रूजू करून घेण्याबाबत सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्या.

सैनिक सेवेदरम्यान बहाल झालेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची शासकीय सेवेकरिता वैधता देणे. या सर्व मागण्यांचा शासन सकारात्मकतेने विचार करून सविस्तर प्रस्ताव तयार करून याला मान्यता घेण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदच्या सदस्यांनी बैठकीत दिले.

0000000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi