Thursday, 26 June 2025

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारीअंमलदार यांना

राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदक

अलंकरण कार्यक्रम संपन्न

 

मुंबई, दि. २६ : राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदकउल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ तसेच २०२२ या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

एक्केचाळीस (४१ ) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदकतीन (३) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच एकोणचाळीस (३९) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयरपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामहासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमारपोलीस महासंचालकमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागीमुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांसह पोलीस अधिकारीसेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते पदकाने अलंकृत पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi