Sunday, 22 June 2025

माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यातील 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार अंमलबजावणी

 राज्यातील 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार अंमलबजावणी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत 

          माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणीनंतर माझी वसुंधरा अभियान 6.0ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व 27895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला असून त्यावर 15 जुलै 2025पर्यंत सूचना/अभिप्राय मागविण्यात आले आहे. त्या सूचनांचा विचार करून अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) अंतिम करण्यात येणार आहे.

 

त्रयस्थ यंत्रणेद्वारे होणार कामांचे मूल्यांकन

          या अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वीवायूजलअग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामांचे मूल्यमापन करून गुणांकन दिले जाणार आहे. यामध्ये अमृत गटासाठी 15,125 व अमृत गट वगळून इतर नागरी संस्थांच्या गटांसाठी 14,625 आणि ग्रामपंचायतीसाठी 13,625 गुण ठेवण्यात आले आहे. त्रयस्थ यंत्रणेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांचे मूल्यांकन करून पुढील वर्षी 5 जून 2026 रोजी निकाल जाहीर करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

 

          कार्बन पृथक्करणहरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या बाबींवर लक्ष केंद्रीत करून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तमुख्याधिकारीग्राम विकास अधिकारीग्रामसेवक आदींनी माझी वसुंधरा अभियान 6.0 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावीअसे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

          विसंअ/नंदकुमार वाघमारे

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi