Wednesday, 14 May 2025

दिलखुलास' कार्यक्रमात डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

 

मुंबईदि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'बदलते वातावरणमानसिक ताणतणाव तसेच माता व बालकांचे आरोग्यया विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 15, शुक्रवार दि. 16, शनिवार दि. 17 आणि सोमवार दि.19 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहेनिवेदिका रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

बालके हे देशाचे भविष्य आहेतकोणत्याही देशाचा सर्वांगीण विकास हा त्या देशातील महिला व बालकांचे सुदृढ आरोग्यशैक्षणिक विकास तसेच आर्थिक सक्षमतेवर अवलंबून असतो. ही बाब विचारात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने शासनस्तरावर विविध योजना आणि उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. बदलते वातावरण व जीवनशैली यामुळे मानसिक ताणतणाव याचबरोबर आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून महिला व बालकांच्या आरोग्यासाठी घ्यायची खबरदारीयाविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोजेकर यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi