Thursday, 15 May 2025

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या "स्मार्ट बस" येणार

 सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या "स्मार्ट बस" येणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 15 : भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या " स्मार्ट बसेस " घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

नव्या तीन हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री श्री. सरनाईक म्हणाले कीनवीन लालपरी सह येणाऱ्या सर्व बसेस मध्ये ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरेजी.पी.एस. तंत्रज्ञान, एल.ई.डी. टीव्हीवाय-फायचालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणायाबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञान वर आधारित (anti- theft technology ) बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.

            स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असूनप्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार असूनचालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा " तिसरा डोळा " लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये "पार्किंग" मध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील अशी यंत्रणा बस मध्ये बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi