धोरणात्मक अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर
नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा, तुळजापूर मंदिर संस्थान, वाळू उत्खनन आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांसारख्या प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करण्यात आला याचे उदाहरणे दिली. जीआयएस, पिंग काउंट, जन स्वास्थ्य व्यवस्थापन इ. माध्यमातून कार्यपद्धतीचे संपूर्ण मॉनिटरिंग शक्य झाले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन, युपीआय, अॅग्री स्टॅक याबाबतही त्यांनी माहिती दिली. तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीपूर्वी संबधित तंत्रज्ञानाची शाश्वतता, विस्तारक्षमता आणि अनुकरणीय आहे का याबाबतही खात्री करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सत्रात सहभागी तज्ज्ञांनी शासकीय यंत्रणांमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देत त्याद्वारे कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जलद सेवा वितरण कसे शक्य होते याची सखोल माहिती दिली. यामुळे आगामी काळात शासकीय धोरणांची अंमलबजावणी अधिक सक्षम, डिजिटल आणि लोकाभिमुख होणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment