Tuesday, 4 March 2025

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,pl share & support

 विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

 

मुंबईदि. : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेछत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाच्या इतिहासाशीसंस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात 696 लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. ते उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे त्यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi