Monday, 10 March 2025

सज्जनगडावरील ब्रह्मपिसा स्मारक*

 *सज्जनगडावरील ब्रह्मपिसा स्मारक*



श्रीसमर्थांचे कल्याणावर विशेष प्रेम होतं. हे कांहीं शिष्यांना रुचत नव्हतं. सर्व शिष्यांच्या निष्ठेची परीक्षा घ्यावी म्हणून समर्थांनी एक दिवस वेडयाचे सोंग घेतले, सर्वांगाला शेंदूर फासला, जटा विसकटल्या, हातातं तलवार घेउन गरगरा फिरवत आरडा ओरडा करू लागले. समर्थांना नेमके काय झालं हे जाणून घेण्यासाठी काही शिष्य त्यांचेजवळ गेले, तेंव्हा समर्थ ओरडून म्हणाले, खबरदार! कुणी जवळ याल तर, या तलवारीने ठार करीन. तलवारीच्या धाकाने कुणीही समर्थांच्या जवळ जाण्याचे धाडस करीनात. 


त्याचवेळी उरमोडी नदीवरून पाण्याचे हंडे घेउन कल्याणस्वामी मठात आले. समर्थ मठात नाहीत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.

इतर गुरुबंधूकडून समर्थांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे व त्यांना ब्रह्म लागून ते पिसाटासारखे वागत आहेत, हे ऐकल्यावर कल्याण समर्थांना आणण्यासाठी धाब्याच्या मारुतीकडे गेले. तेंव्हा समर्थ ओरडून म्हणाले, "कल्याणा, जवळ येउ नकोस, तुझा शिरच्छेद करीन." 


परंतु कल्याण विनम्रपणे समर्थांकडे धावत सुटले. तिकडून समर्थही कल्याणाकडे रागाने तलवार उगारत धावून आले. समर्थ जवळ येताच कल्याणांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले व म्हणाले, "गुरुच्या हातून मरण येणे यापरते भाग्य कुठले." 


समर्थीनी कल्याणाला आलिंगन दिले. हातातील तलवार खाली ठेवली आणि म्हणाले, "बाकीचे शिष्य माझ्याकडे देहबुद्धीने येत होते. तूच फक्त आत्मबुद्धीने आलास." 


सर्व शिष्यांना श्रीसमर्थांचे कल्याणावर विशेष प्रेम का समजून आले. 

ही घटना जेथे घडली, त्या जागेला ब्रहापिसा असे म्हणतात. गुरुशिष्याच्या प्रेमाचं, भक्तिच, श्रध्देच हे स्मारक आहे.


जय जय रघुवीर समर्थ!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi