Sunday, 23 June 2024

या कवितेत किती मुलींची नावे आहेत सांगा पाहू ?? 🤔

 या कवितेत किती मुलींची नावे आहेत सांगा पाहू ??

🤔

कवितेला मी माध्यम बनवून

एकच अर्चना माझी जाणून

कोणासमोर आणू दर्शना

प्रकट करतोय माझी भावना.

प्रेरणा कुठे दिसत नाही

स्वप्नासाठी जगतोय

मीच माझी प्रतिमा पाहून

जगी स्नेहाची ओळख देतोय

रेशमाचे जुने नाते 

पण ह्रुदयात ममता राहते

अभिलाषा मनात आणते

आठवून ती निवेदिता

प्रचिती रसिका येते

प्रीतिने मज फूल द्यावे

तृप्तीने नयनात झुलावे

कोमल सरोज सुन्दर असुनही

प्राजक्ताला जवळ घ्यावे

कल्पना कल्पिता मानसी

चांदण्यात कृतिका हसली

संगीताशी इतकं नातं जुळलं

की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं

*मैफिली*त शोभा आली

मग मेघाने घोळ घातला

आणि ऋचा निघून गेली

श्रद्धा आलो घेउन

ओढ़ लागली भक्तीची

मनात माझ्या पूजा ठेवून

वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना

संजीवनी जीवनी आली

समृद्धीच्या नादात

शांती विसरावी लागली

आधी विद्या मग किर्ती

निशानंतर उषा जाशी

आधी माया मग मोहिनी

छायानंतर ज्योति जशी...

शेवटी चंद्राजवळ रोहीणी.

💃

👆🏻 

नक्की सांगा बरं..😎

वाट बघतोय..😜😀

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi