Tuesday, 14 December 2021

 *अकलेचे भिकारी.....कोएसोचे भ्रष्टाचारी*

*अलिबागच्या बिनडोक कोकण एज्युकेशन सोसायटीला चॅरिटी कमिशनरचा दणका, लपविलेली माहिती अर्जदारास देण्याचे आदेश*

शिक्षण संस्था आणि शाळा चालविणाऱ्या रायगडमधील कोकण एज्युकेशन सोसायटीने माझ्या माहिती अधिकार कायद्यातील अर्जाला उत्तर देताना अकलेची दिवाळखोरी अखेर पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

*भ्रष्टाचाराने बरबटलेली कोकण एज्युकेशन सोसायटी ही शेकापचा गुंडगिरी करणारा (विधानसभेत पडलेला) आमदार बाळाराम पाटील याच्यामुळे अधोगतीला लागली आहे. शिक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरणारे संस्थेचे दोन भ्रष्ट संचालक संजय दत्ता पाटील आणि अजित पुरूषोत्तम शहा या दोघांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे संस्थेचा सीईओ विनायक खोपकर आणि त्याच्यासोबतची पिलावळ एवढी सैरभेर झाली आहे की त्यांच्यावर शासनाचे आणि कायद्याचे नियंत्रण आहे हेच ते विसरून गेले आहेत.*

लाखो करोडोंची कंत्राटे काढून, संस्थेतील शाळांमधे शिकणाऱ्या *गोरगरीब मुलांकडून फीच्या मार्गाने ओरबाडलेला पैसा* वापरून आता त्याची माहिती देताना *संस्था माहिती देण्यास बांधील नाही* असे बिनडोक उत्तर दिल्यामुळे कोकण एज्युकेशन सोसायटीची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर झाली आहेच पण यातून *त्यांच्या कंत्राटांमधील भ्रष्टाचारावरही शिक्कामोर्तब झाले आहे.*

*ॲड. दत्ता पाटील या एका असामान्य आणि प्रथितयश वकीलाच्या पोटी जन्माला येऊनही कायद्याला फाट्यावर मारणारा संजय पाटील आणि गरीब मुलांच्या माथी महागडी पुस्तके मारून स्वतःच्या तुंबड्या भरणारा व्यापारी अजित शहा या मूर्खांना कायदा कधी माहीत नव्हता हे त्यांच्या कामातून आजवर दिसलेच... पण अजूनही तो माहीत करून घेण्याची बुद्धी त्यांना होत नाही हा त्यांना आयत्या बिळात नागोबा पद्धतीने मिळालेल्या पदांचा आणि अधिकारांचा माज आहे.*

*शासनाचे अनुदान आणि मुलांची फी खाणारी ही भ्रष्ट संस्था करोडोंच्या कंत्राटांची माहिती लपविण्यासाठी प्रयत्नशील आहे.* पण आम्ही त्यांच्या घशात हात घालून ही माहिती घेतल्याशिवाय आणि संस्थेतील भ्रष्ट चांडाळचौकडीला धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही. 

*आम्हाला माहिती देण्यास नकार देणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीला अपिल सुनावणीत अलिबाग येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दणका दिला असून, सर्व माहिती आम्हाला देण्याचे आदेश दिले आहेत.* लवकरच यांच्या भ्रष्टाचाराची सखोल माहिती रायगड आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन यांचे खायचे दात दिसतील यात मला शंका नाही. धन्यवाद.

आपला,

*श्री. रमेश नामदेव देवरूखकर*

*पत्रकार*

8104508844

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi