Saturday, 18 September 2021

 मुकेश अंबानी सकाळी अन्टिलीया बंगल्यात संगमरवरी हॉलमध्ये, इम्पोर्टेड डायनिंग टेबल वर बसले होते.

समोर चांदीच्या थाळीत बिनमिठाची, बिन तिखटाची, बिना मसाल्याची भेंडीची भाजी आणि बिन तेलाची चपाती होती, गरम केलेले मिनरल पाणी होते.सात हजार कोटींचे घर, दहा नोकर नाष्टा वाढत होते, सेंट्रल एसी सुरू होते, गारेगार हवा देत होते. 

इमारती खालून प्रदूषणाचे धुराडे धूर ओकत होते.


अशा वातावरणात अंबानी नाष्टा करत होते.......


इकडे शेतात दूर बांधावर शेत मजूर बसला होता. त्यानेही शिदोरी सोडली, त्यात तेल लावलेली चपाती, हळद-मसाला-तेल-मीठ  टाकलेली भेंडीचीच भाजी होती, सोबत होता कांदा व ठेचा. बरोबर तोंडी लावायला लुसलुशीत मेथीची भाजी, प्यायला मटक्यांतले थंडगार पाणी होते.समोर हिरवे गार शेत, पिकं वाऱ्यावर डोलत होती, थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट.


आणि 

तो आरामात न्याहरी करत होता.


सात अरब करोडचा मालक जे खात होता तेच 200 रुपये रोजंदारीचा शेत मजूर खात होता.

 

पण


चविष्ट खात होता


आता सांगा, दोघांत काय फरक होता. अंबानी पन्नास वर्षाचा होता आणि मजूरही पन्नास वर्षाचाच होता.


नाष्ट्यानंतर अंबानी बीपी, मधुमेहाची गोळी खात होते आणि शेतमजूर चुना लावून पान खात होता.


कमी कुणीच नाही, मोठा कुणीच नाही.

  

म्हणून 


आनंद शोधू नका

आनंद निर्माण करा कारण 

आनंद निर्मीती वर GST 0% आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi