Saturday, 2 May 2026

महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लोकभवन दुमदुमले राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पदम पुरस्कार विजेते सन्मानित

 महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा

बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लोकभवन दुमदुमले

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पदम पुरस्कार विजेते सन्मानित

 

मुंबई, दि. 1 : बाल वारकऱ्यांनी केलेल्या 'ज्ञानदेव - तुकारामगजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला.  राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आलात्यावेळी राज्यपालांचे स्वागत बाल वारकऱ्यांच्या दिंडीने व नामगजरात करण्यात आले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांअंतर्गत शुक्रवारी (दि. 1 मे) महाराष्ट्र राज्य स्थापनेसह गुजरात राज्य स्थापना दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

देश म्हणजे केवळ भागलिक सीमांनी वेढलेले क्षेत्र नसून देश हा विविध संस्कृतींचा सुंदर समूह असतो. एखाद्या राज्याला समजून घ्यायचे असेल तर तेथील संस्कृती समजून घेतली पाहिजेअसे यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितले.  प्रत्येक राज्याची संस्कृती भिन्न असली तरीही त्यांमध्ये एकात्मतेचा धागा जुळलेला आहे असे त्यांनी नमूद केले.

अमरवाणी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्लेकरगायिका उपग्ना पंड्या व कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी सुंदर मराठी व गुजराती लोकगीते व भक्तिगीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. 

Friday, 1 May 2026

आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

 कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.   

             विशेष म्हणजे हा प्रकल्प ज्या उंबरखिंडीच्या परिसरात साकारला आहेतिथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघलांचा पराभव केला होताया ऐतिहासिक संदर्भाची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

        यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भातील व्हिडिओचा संदर्भ देत त्यांची व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. "सुप्रिया ताईतुम्ही आज शेवटच्यांदा वाहतूक कोंडीत अडकलातआता 'मिसिंग लिंकसुरू झाल्यामुळे यापुढे तुम्हाला किंवा इतर कोणत्याही प्रवाशांना घाटात ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी या प्रकल्पासाठी घाम गाळणाऱ्या सर्व कामगारांचे आणि एमएसआरडीसीच्या चमूचे कौतुक केले. या 'कनेक्टिंग लिंक'मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत

 प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणावॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्सतयार करण्यात आले आहेतजेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असूनलेनची शिस्त पाळली जावीयासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

        अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीतदऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होतेअसे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.   

मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

 मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

                      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

रायगड-अलिबाग,दि.01 (जिमाका) :- "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंकहा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाहीतर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायरठरेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   

             या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंकसंबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.

             या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेरोजगार हमी मंत्री भरत गोगावलेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरखासदार सुनील तटकरेखासदार श्रीरंग बारणेगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरविभागीय आयुक्त रुबल अग्रवालविशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र डॉ.संजय दराडेजिल्हाधिकारी किशन जावळेएमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाडजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 

 १ ते ८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्यात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ संकल्प सप्ताह

-राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबईदि. ३० : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र मोहिमेला सक्रिय प्रोत्साहन देत १ ते ८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर संकल्प सप्ताह प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंधतपासणी व जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

या मोहिमेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सप्ताहात विविध विषयांवर आधारित उपक्रम राबविले जाणार असूननागरिकांचा व्यापक सहभाग नोंदविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने आठवडाभर राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः प्रत्येकाने योग्य यूआरएल, म्हणजेच https://se.census.gov.in,

 'घर-यादी आणि गृहगणनाया जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक ज्यावेळी घरी भेट देतील त्यावेळी स्व-गणना डेटाची पडताळणीपुष्टीकरण आणि तो अंतिमतः सादर करण्यासाठी एसई आयडी सामायिक करणे आवश्यक असेल. स्व-गणना पोर्टलद्वारे सादर केलेला सर्व डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि कडक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केला जातो. प्रत्येकाने योग्य यूआरएलम्हणजेच https://se.census.gov.inला भेट देत असल्याची खात्री करावी आणि एसएमएस/ई-मेल संवादांची सत्यता पडताळून पाहावीअसा सल्ला देण्यात येत आहे.

स्वगणना करणाऱ्या नागरिकांनी हे सुनिश्चित करावे की ते https://se.census.gov.in या योग्य युआरएल ऍड्रेसलाच भेट देत आहेत तसेच ज्या एसएमएस /ई-मेल श्रेणीतून वन टाइम पासवर्ड (ओटीपी ) प्राप्त झाला आहेत्याची सत्यता पडताळून पाहावी.

एसएमएस /ओटीपी द्वारे प्राप्त झालेल्या जनगणनेशी संबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात RGICEN हा कीवर्ड असतोउदा. AD-RGICEN-S, BD-RGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.

0000

जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षितअधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल.

 मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेतमहाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारीडॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली कीभारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल. 

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावरएक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडीतयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

स्व-गणना करणे ऐच्छिक आहेअनिवार्य नाही. जर कोणी स्व-गणना केली नसेलतर काळजी करण्याची गरज नाहीमाहिती गोळा करण्यासाठी/नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्येक घरी भेट देतील असे डांगे यांनी सांगितले.

स्व-गणना पर्यायांतर्गत व्यक्ती त्यांची माहिती स्वतःच ऑनलाईन स्वरुपात https://se.census.gov.in येथे भरु शकतील. स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक एसई आयडी येईल. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा गणनाकार तुमच्या घरी भेट देतीलतेव्हा हा एसई आयडी त्यांच्यासोबत सामायिक करणे आवश्यक आहे. गणनाकाराकडून एसई डेटाची पडताळणी/मान्यता झाल्यानंतरच घर-यादी आणि गृहगणनेसाठीची गणना पूर्ण मानली जाईल.

Featured post

Lakshvedhi