Wednesday, 29 April 2026

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शुक्रवार,  १ मे २०२६ रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे  यांनी केले. राष्ट्रीय गीतराष्ट्रगीत आणि राज्यगीताने  ध्वजाला सलामी देण्यात आली.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दलनि:शस्त्र दल आणि शालेय पथकास पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस पथक,  द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष पथक आणि तृतीय पारितोषिक संयुक्तपणे बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकगोंदिया व गडचिरोली जिल्ह्याचे सी ६० पथक यांनी पटकाविला. निःशस्त्र दलांमध्ये प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दलद्वितीय पुरस्कार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,  तृतीय क्रमांक राज्य उत्पादन शुल्क यांनी पटकाविला.

            या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. शालेय पथकांमध्ये  प्रथम पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलींच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर यांच्या पथकासद्वितीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलांच्या डॉ. ॲन्टोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर यांच्या पथकास  आणि तृतीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुले सेंट पॉल हायस्कूलदादर यांच्या पथकाने पटकाविला.

एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार

 एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार

एनटीपीसी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे या उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेमध्ये ८०० मे.वॅ. ने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मूळ सामंजस्य करारात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. याअनुषंगाने एनटीपीसी लिमिटेड यांनी केलेली विनंती विचारात घेता मूळ सामंजस्य करारातील खालील नमूद उदंचन योजनांसाठी सुधारीत सामंजस्य करण्यात आला.

विकासकाचे नाव – एनटीपीसी

सामंजस्य कराराचा दिनांक - ०३.०९.२०२४

सामंजस्य करारानुसार स्थापित क्षमता (मे.वॅ) -  अंबा उदंचन जल विद्युत प्रकल्प - ८००

कुंभे उदंचन विद्युत प्रकल्प – १००० मे. वॅ.

पूरक पत्रानुसार सुधारित क्षमता       अंबा प्रकल्प – १५०० मे.वॅ.

     कुंभे प्रकल्प – ११०० मे.वॅ.

पूरक पत्रानुसार मे. वॅ क्षमतेत होणारी (वाढ/घट) -अंबा प्रकल्प -  ७०० मे.वॅ.कुंभे प्रकल्प - १०० मे.वॅ.

पूरक पत्रानुसार एकूण क्षमता वाढ (मे.वॅ.) - अंबा प्रकल्प -   ८०० मे.वॅ.कुंभे प्रकल्प – १०० मे.वॅ.

️ पूरकपत्रानुसार एकूण क्षमतेत वाढ- २६०० मे. वॅ.

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी

 रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार

 

 मुंबईदि.२९ : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि 'एनटीपीसीयांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे.

मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंपदा (विदर्भतापी आणि कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा सचिव संजय बेलसरेमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रामुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, 'एनटीपीसी'चे विभागीय कार्यकारी संचालक (वेस्टन रिजन) ई सत्या फानी कुमारमहाप्रबंधक (हायड्रो) मनमीत बेदी,  एनटीपीसीचे (हायड्रो इंजिनिअरिंग) सहायक महाप्रबंधक डॉ. अनुभवहायड्रो इंजिनिअरिंगचे उप महाप्रबंधक डॉ. प्रशांत पांडे,  डॉ. अरबिंद कुमारअपर महाप्रबंधक सूर्य प्रकाश केसरवानीअंबा पीएसपीचे सागर धांडे आदि उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. कपूर व एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक श्री. ई. सत्या फानी कुमार यांनी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी श्री. कपूर यांनी कराराची माहिती दिली.

सार्वजनिक खाजगी भागीदारीव्दारे (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण दि.२० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५९ सामंजस्य करार झाले आहेत. एनटीपीसी बरोबरचा हा राज्याचा एकूण ६० वा सामंजस्य करार आहे. या धोरणास अनुसरून ६० सामंजस्य करारांद्वारे ८२,०१५ मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता अपेक्षित असून याव्दारे रु. ४.२८ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर १.३१ लक्ष मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.

सुपर एल निनो': २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

 सुपर एल निनो': २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

 

          निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने 'हीट वेव्ह'चा (उष्णतेची लाट) इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

            जागतिक हवामान बदलामध्ये 'सुपर एल निनो' ही घटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्र सपाटीचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवामानावर याचे विपरीत परिणाम होतात. यामुळे भारतात मान्सूनवर परिणाम होण्याची आणि उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक राज्यांत तापमान ४५°सेल्सीअस वर जाण्याचे संकेत आहेत.

            भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मानकानुसार किनारी प्रदेशासाठी: सलग दोन दिवस कमाल तापमान ३७°सेल्सीअस पेक्षा जास्त राहिल्यास. जेव्हा तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा ४.५°सेल्सीअस ते ६.४°सेल्सीअस ने वाढते, तेव्हा त्याला 'उष्णतेची लाट' म्हणतात.  : जेव्हा तापमान सरासरीपेक्षा ६.५°सेल्सीअस पेक्षा जास्त वाढते, तेव्हा अतिउष्ण लाट (Severe Heat Wave) ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

उष्माघाताची लक्षणे: वेळीच ओळखा धोका

            उष्माघात ही केवळ थकव्याची अवस्था नसून ती एक वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसताच सावध व्हावे:

१. शरीराचे तापमान कमालीचे वाढणे पण घाम न येणे.

२. चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळणे.

३. त्वचा कोरडी आणि लाल होणे.

४. तीव्र तहान लागणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे.

५. लहान मुलांमध्ये प्रचंड चिडचिड आणि सुस्ती येणे.

उष्णतेपासून बचावासाठी 'हे' करा (मार्गदर्शक सूचना)

 जलसंजीवन मंत्र

            तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.

निसर्गदत्त पेयांचा वापर करा: लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, आमसूल सरबत आणि घरगुती पन्हे शरीरातील ओलावा टिकवून ठेवतात.

 पोशाख आणि घराबाहेर पडताना काळजी

            बाहेर पडताना नेहमी सुती, हलके आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे घाला.

डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरा.

शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

 आहारातील बदल

प्रथिनयुक्त (High Protein) आहार आणि मांसाहार उन्हाळ्यात कमी करावा, कारण तो पचायला जड असतो.

बाहेरील उघड्यावरचे पदार्थ किंवा शिळे अन्न खाणे टाळा.

अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

 घराचे व्यवस्थापन

दुपारच्या वेळी खिडक्यांना पडदे लावून ठेवा. रात्री हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.

घरातील वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

सामाजिक जबाबदारी

            आपण आपल्यासोबतच मुक्या प्राण्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत बांधा आणि त्यांना पुरेसे पाणी द्या.

लक्षात ठेवा: उन्हाळ्याची ही तीव्रता केवळ निसर्गाचा कोप नसून वाढते औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीचा परिणाम आहे. स्वतःचे रक्षण करण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच उन्हाळ्यावरील कायमस्वरूपी उत्तर आहे.

            आपत्कालीन संपर्क: तब्येत बिघडल्यास वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा १०८ या हेल्पलाईनवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करा.

सावध राहा, सुरक्षित राहा आणि उन्हाळ्याचा सामना धैर्याने करा!

                                                                        प्रविण डोंगरदिवे


एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून प्रक्रिया पूर्ण करणार

 एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून प्रक्रिया पूर्ण करणार


मुख्य सचिवांनी पुढे सांगितले की, भविष्यात नागरिकांना वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज भासणार नाही. एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निकाल देणार आहेत. या दृष्टीने शासन विविध कंपन्यांसोबत काम करत असून, येत्या काही महिन्यांत ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज

 नागरिकांना अधिक सुलभजलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज

-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

 

मुंबईदि.28 : नागरिकांना अधिक सुलभजलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव होते व या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेकोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंहपुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंगछत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणालेपासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईलअशी प्रणाली विकसित केली जात आहे.

प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कोल्हापुरी कारागिरांना

  व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या,  प्राडा सोबत हा करार भारतीय पारंपरिक हस्तकलेसाठी आणि अनेक दशकांपासून या कलेचे संरक्षण करणाऱ्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.

 

प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कोल्हापुरी कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. हे प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी येथे दिले जाईल. त्यापैकी सर्वोत्तम ३० कारागिरांना इटलीतील प्राडा अकादमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे

Featured post

Lakshvedhi