.या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून, उत्पादनवाढीस चालना मिळत आहे. त्यामुळे या योजनांची सातत्याने प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समन्वयाने कार्यरत असल्याचेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 28 March 2026
पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट ·
पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी
घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट
· पुढील काही दिवसांत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आश्वासन
मुंबई, दि.२७: महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून, या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभागही दिसून येत आहे. मात्र, या वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) अंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
झगमगला महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती २ हजार ड्रोनच्या साहाय्याने प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज व मुंबईची ओळखीचे स्थळे आकाशात साकारली
झगमगला महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती
२ हजार ड्रोनच्या साहाय्याने प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज व मुंबईची ओळखीचे स्थळे आकाशात साकारली
मुंबई, दि. २७ : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीराम नवमी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आझाद मैदान येथे भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले.
रात्रीच्या गडद आकाशात झेपावलेल्या ड्रोननी प्रभू श्रीरामांची धनुर्धारी प्रतिमा साकारत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य प्रतिमेने आकाश उजळून निघताच उपस्थितांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जल्लोष झाला. पुढे छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्रातील गड-किल्ले, गणराय तसेच संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमा आकाशावर साकारत महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमानास्पद प्रवास सादर करण्यात आला.
या सोहळ्यात मुंबई शहराची ओळखही प्रभावीपणे उभी करण्यात आली. गेटवे ऑफ इंडिया, वांद्रे-वरळी सी-लिंक, ताज महल पॅलेस हॉटेल यांसारख्या स्थळांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. याशिवाय ‘वंदे भारत’ रेल्वे धावत असल्याचा भास निर्माण करणारे दृश्य प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले. सुमारे १० ते १५ मिनिटे चाललेल्या या शोदरम्यान आझाद मैदानावर उपस्थित आबालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्षणोक्षणी टाळ्यांचा कडकडाट केला.
ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर असेल.
ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर असेल.
बाह्यरुग्ण विभागासाठी १४ मजली स्वतंत्र इमारत असेल.यामध्ये दररोज सुमारे १६,००० रुग्णांची क्षमता, १००+ तपासणी कक्ष, रक्तपेढी व प्रयोगशाळा असेल.
आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रुग्णालयात रुग्णांना ये जा करण्यासाठी ई बग्गी रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांनी प्रास्ताविक केले. आभार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मानले.
0000
लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास – टप्पा २ मध्ये होणार विविध कामे
महानगरपालिका काम करत आहे.
लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास – टप्पा २ मध्ये होणार विविध कामे
शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा पुनर्विकास टप्पा २ मध्ये रुग्णालयाची मुख्य इमारत, कर्करोग उपचार सेवा, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत.
सध्या १९०० वरून नव्याने
होणाऱ्या रुग्णालयात एकूण ३,२८६ खाटांची क्षमता असेल.
१५ मजली मुख्य इमारत २,२०० खाटांची क्षमता.
२४ तास आपत्कालीन सेवा व ऑपरेशन थिएटरची संख्या १२ वरून २४.
रेडिओलॉजी सुविधा एक्स-रे, सिटीस्कॅन एम. आर. आय., सोनोग्राफी न्यूमॅटिक शूट प्रणाली – नमुने जलद पाठवण्यासाठी उपलब्ध असतील.
एकाच छताखाली विशेष सेवा देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजना यांचे कार्यालय देखील मुख्य रुग्णालय इमारतीमध्ये असणार आहे.
अत्याधुनिक प्रयोगशाळा, फार्मसी, कॅथलॅब, रुग्ण आहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपाहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष असेल.
कर्करोग रूग्णांसाठी १३ मजली स्वतंत्र इमारत असेल यामध्ये २०० खाटा असतील. केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेट स्कॅन, एमआरआय, सिटीस्कॅन सुविधा असेल. कर्करुग्णांसाठी अल्पदरात व मोफत उपचार उपलब्ध होतील.
आपत्कालीन सेवा इमारत ही १४ मजली इमारत असेल, यामध्ये ६०० खाटा असतील.
सायन रुग्णालयाचा पुनर्विकास म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात
सायन रुग्णालयाचा पुनर्विकास म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात
– महापौर रितू तावडे
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, आजचा हा प्रकल्प केवळ इमारतीचा विस्तार नसून आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीमुळे लाखो रुग्णांना उपचार मिळाले असून, ही सुविधा आता नागरिकांच्या हक्काची बनली आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सायन रुग्णालयात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, हृदयविकार उपचार सुविधा, तसेच वाढीव रुग्णखाटा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता आणि गुणवत्ता दोन्ही वाढणार आहेत. मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव अशी संस्था आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरांवर आरोग्य सेवा पुरवते. दरवर्षी सुमारे ७५ लाख बाह्यरुग्ण आणि २५ लाखांहून अधिक रुग्णांना उपचार दिले जातात. वन सिटी, वन हेल्थ सिस्टीम उभारत असून यामुळे मुंबईतील कोणत्याही महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांना सुलभ आणि समन्वित सेवा मिळेल. तसेच, आरोग्य व्यवस्थेचा खरा विकास केवळ इमारतींमध्ये नसून, सेवाभाव, पारदर्शकता आणि रुग्णांचा विश्वास यामध्ये आहे. प्रत्येक रुग्णामागे एक कुटुंब आणि अपेक्षा असते, त्या पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘फाईव्हस्टार सुविधा, पण सर्वांसाठी’ या ध्येयाने महानगरपालिका काम करत आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. सुमारे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून ४,५०० रुग्णालये या योजनांमध्ये सहभागी आहेत. काही गंभीर ९ आजारांसाठी २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री जनकल्याण योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुंबई महापालिकेच्या आरोग्ययंत्रणेच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे.
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
जयहिंद मित्रांनो जयहिंद शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा 2019 5 मे 2019 रविवार या दिवशी आद्यक्रांतिवीर वासुदेव ब...