Friday, 13 February 2026

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रथमच बॅन्ड महोत्सवाचे आयोजन

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रथमच बॅन्ड महोत्सवाचे आयोजन

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

·         मुंबईतील वांद्रे येथील बँड येथे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

 

मुंबई दि. १३ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत  यंदा प्रथमच बँड महोत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ॲम्फिथिएटरबँड स्टॅन्ड वांद्रे पश्चिममुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. 

 

या बॅन्ड महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध बॅन्ड पथक सहभागी होणार असून हा आगळावेगळा बॅन्ड महोत्सव प्रथमच शासनाच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे.

           

मुंबई व पुणे पोलीस बॅन्ड पथकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. १४ मार्च रोजी मुंबई पोलीस बॅन्डझंकार ब्रास बॅन्डकिल्ले मच्छिंद्रगड सांगलीमास्टर रफी ब्रास बॅन्डजळगांव यांचे सादरीकरण होणार आहे तर रविवार१५ फेब्रुवारी २०२६ पुणे पोलीस बॅन्डपुणेबाबुलाल ब्रास बॅन्डनासिकजनता बॅन्ड पाटोदाबीडदर्यावर्दी ब्रास बॅन्डमुळेखंड कोळीवाडारायगड तर समारोपाच्या दिवशी सोमवार१६ फेब्रुवारी २०२६पाईप बॅन्ड पुणे - (एसआरपी), वेस्ट बॅन्डमुंबईअमर बॅन्डबारामतीपुणे या बॅन्ड पथकाचे सादरीकरण होणार आहे

पॉश (पीओएसएच) कायद्यानुसार, ज्या कार्यालयांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत

 पॉश (पीओएसएच) कायद्यानुसारज्या कार्यालयांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेतअशी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रममहामंडळेस्थानिक स्वराज्य संस्थाशासकीय कंपन्याखासगी कंपन्या व उद्योगस्वयंसेवी संस्थाट्रस्टसोसायटीशैक्षणिक संस्थारुग्णालयेव्यापारीऔद्योगिकसेवा व वित्तीय क्षेत्रातील आस्थापनेक्रीडा संस्थाप्रेक्षागृहेवितरण व विक्री केंद्रे आदिना संस्थांना अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य

 कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी

अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य

-         आयुक्त नयना गुंडे

·         कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन न केल्यास ५० हजार दंड

 

मुंबई, दि. १३: दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या लैगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती’ स्थापन करणे बंधनकारक असूनयाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.

अंतर्गत समिती स्थापन न केल्यास  संबंधित मालक किंवा प्रमुखांवर ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. जर ही चूक पुन्हा केली गेलीतर संबंधित आस्थापनाचा परवाना रद्द करणे किंवा दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे.

९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी

 ९८० शाळांतून निवडलेले १०० गुणवंत विद्यार्थी

राज्यातील ९८० विजाभज आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेण्यात आली. त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनी अशा एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सहलीचे नियोजन :-

 विद्यार्थी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पुणेबेंगलुरूत्रिवेंद्रमकन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.

·         १५ फेब्रुवारी रोजी पुणे - पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व नॅशनल वॉर मेमोरियल येथे भेट.

·         १६ फेब्रुवारी पुणे - भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था येथे प्रयोगाधारित विज्ञान कार्यशाळा व शास्त्रज्ञांशी संवाद.

·         १६ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर मंत्री अतुल सावे व विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून इस्त्रो दौऱ्यासाठी हिरवी झेंडी दाखवणार आहेत.

·         १७ फेब्रुवारी बंगळुरू – विश्वेश्वरय्या औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालयहिंदुस्तान विमान निर्मिती वारसा संग्रहालय व लालबाग वनस्पती उद्यान भेट.

·         १८ फेब्रुवारी तिरुवनंतपुरम (थुंबा) - भारतीय अंतराळ संशोधन संस्था केंद्रउपग्रह प्रदर्शन विभाग व प्रक्षेपण तंत्रज्ञान गॅलरी भेटरॉकेट प्रक्षेपणाचे अवलोकन. तसेच नेपियर संग्रहालय व कोवलम समुद्रकिनारा भेट.

·         १९ फेब्रुवारी कन्याकुमारी - पद्मनाभपुरम राजवाडाविवेकानंद शिला स्मारकतिरुवल्लुवर पुतळागांधी स्मारक तसेच सूर्यास्त दर्शन.

राज्यातील विविध ‘विजाभज’ आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड

 मंत्री सावे म्हणालेराज्यातील विविध ‘विजाभज’ आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मितीप्रक्षेपण तंत्रज्ञानप्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशीतज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणेत्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार असून त्यांच्या सुरक्षित व सुसूत्र प्रवासाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची निवास व्यवस्था करण्यात आली असून दररोज आवश्यक सर्व सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे. असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.

तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ

 तांड्यापासून अंतराळापर्यंत : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शासनाची साथ

-         इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

·         अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

·         विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत विजाभज आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार

 

मुंबईदि. १३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासासंशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधीं ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला.

महाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा

 इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणालेमहाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससीएमपीएससी,  स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेती व उद्योग क्षेत्रात ३५० विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.

संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण धोरणलेखांकन धोरण आणि कर्मचारी भरती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या बैठकीत संस्थेच्या विविध योजनांना मंजुरी देताना चालू आर्थिक वर्षासाठी तसेच२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी करार करून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासही मान्यता देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi