Saturday, 31 January 2026

या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन

 या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधताखाद्यपदार्थपोशाखहस्तकलालोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. भारत पर्व 2026मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रपर्यटन स्थळी जाण्याची सोयउपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

सांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेयुनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला

 ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा

जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला

- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई

 

  • भारत पर्व 2026’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग
  • ‘भारत पर्व 2026मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

 

मुंबईदि.31 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स व ग्यानपथनवी दिल्ली येथे 26 ते 31 जानेवारी दरम्यान भारत पर्व 2026’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दालन उभारुन सहभाग घेतला होता. ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांडले. महोत्सवामधील पर्यटन विभागाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित

   विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. पिटिशन ड्राफ्टिंगसाठी एआयचा उपयोग करताना होणाऱ्या धोक्यांबाबतही सतर्क राहायला हवे. संशोधनाशिवाय गुणवत्ता येत नाहीत्यामुळे हे रिसर्च सेंटर भविष्यात दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे केंद्र बनेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

राज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून अतिशय कमी कालावधीत ही उत्कृष्ट वास्तू उभारली गेली आहे. अकॅडमीच्या इमारतीचे दर्जेदार आणि अल्पावधीत पूर्ण झालेले बांधकाम हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची आठवण करून देणारे असल्याचे सांगून त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय हा देशातील पहिलाच निर्णय असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले. बदलते कायदेनवीन फौजदारी कायदेतसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयव तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी अकॅडमीसाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केले जाईलअसेही सांगितले.

तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार

 तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरेभारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंगमहाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

 कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील

दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची  

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर' (बीबीएटीआरसीचे कौतुक करीत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी आवर्जून नमूद केले कीज्याप्रमाणे न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण अकॅडमी आहेत्याप्रमाणे वकिलांसाठी प्रशिक्षण अकॅडमी का नाहीयाचे उत्तर बार कौन्सिलने दिले आहे. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज (कोर्ट क्राफ्ट) यातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

            तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरेभारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंगमहाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

 राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

मुंबई31 : महाराष्ट्र के राज्यपाल आचार्य देवव्रत ने आज सुनेत्रा अजित पवार को राज्य के उपमुख्यमंत्री पद एवं गोपनीयता की शपथ दिलाई।

लोकभवन में सादे रूप में आयोजित इस शपथग्रहण समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकरविधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमंत्रिमंडल के सदस्यजनप्रतिनिधिमुख्य सचिव राजेश अग्रवालवरिष्ठ प्रशासनिक एवं पुलिस अधिकारीसुनेत्रा पवार के परिवारजन तथा आमंत्रित गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।





Featured post

Lakshvedhi