Wednesday, 13 May 2026

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे

 शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे

जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

 - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. ११ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसाठा वाढवणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले.

निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भूजल पातळी वाढविण्यासाठी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता. अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाटाचे पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर , पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलाव, तळी, धरणे आणि कालव्यांच्या दुरुस्ती व सक्षमीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात त्यांनी दिल्या.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

 नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि  मान्यवरांच्या हस्ते अनावरण

 

मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.


एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक

 एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक

महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. ११ : राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नांचा सर्वंकष विचार करून प्रभावी धोरण तयार करण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण करणे आवश्यक असून, सध्या उपलब्ध असलेल्या सर्वेक्षणांचा उपयोगही धोरण निर्मितीसाठी करण्यात यावा, असे निर्देश महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले.

 

निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एकल महिला धोरणासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी धोरणाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

महिला व बाल विकास राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांचा विचार करून धोरण अधिक परिणामकारक करण्यात यावे. यासाठी समितीमध्ये आणखी सदस्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच राज्य शासनाचे विविध १३ ते १४ विभाग या विषयाशी संबंधीत असल्याने सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन समन्वयातून धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी.

 

एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि धोरण राबविताना सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

०००००

राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा

    वृत्त 1652

राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा

-         आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. ११ : राज्यतील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

            निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी राज्य कामगार विमा योजनेचा सविस्तर आढावा घेतला.

 

बैठकीत योजनेअंतर्गत नोंदणीकृत सदस्यांची संख्या, सदस्यांकडून प्राप्त होणारी वर्गणी, विमा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले दवाखाने, नवीन दवाखाने सुरू करण्याबाबतची स्थिती तसेच राज्यातील कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या खाटांची माहिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

 

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी कामगारांना आरोग्य सुविधा वेळेत आणि गुणवत्तापूर्ण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, विमा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रुग्णालये व दवाखान्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन दवाखाने सुरू करण्याच्या प्रस्तावांवरही यावेळी चर्चा झाली.

 

कामगार विमा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रुग्णखाटा, उपचार सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळ आणि औषध उपलब्धता याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी 

महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य

 महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य

परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून दिले जाते.

याअंतर्गत यापूर्वी ६० हजार रुपये दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. महिलांच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन गटस्तरावर निर्णय घेतले जातात. यासाठी कोणतीही जमीन किंवा सोने तारण घेतले जात नाही.

केवळ बचतगटांनाच नव्हे, तर वैयक्तिक महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या घरगुती परिस्थितीचा, व्यवसायाच्या गरजांचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला आणि जास्त व्याजदराने पैसे देणाऱ्या अनधिकृत आर्थिक व्यवस्थांना मोठ्या प्रमाणावर आळा बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील ७१ लाख महिलांचा उमेद अभियानात सहभाग

 राज्यातील ७१ लाख महिलांचा उमेद अभियानात सहभाग

मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी सांगितले की, २०११ मध्ये केंद्र शासनामार्फत सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. २०१८ पासून महाराष्ट्रभर या अभियानाचा विस्तार करण्यात आला. गावागावांमध्ये महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, एका गावातील किमान दहा महिलांना एकत्र आणून बचतगट उभारण्यात आले.

महाराष्ट्रात आजपर्यंत ६ लाख  ६८ हजार महिला बचतगटांची स्थापना झाली असून, त्यामध्ये ७१ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात सुमारे ५५ टक्के आर्थिक सक्षमीकरण घडवून आणण्यात या अभियानाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांनाही या अभियानामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

·         ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी, उत्पादनांची विक्रमी विक्री

 

मुंबई,दि.११ : महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, २ मे पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात महिला बचतगटाच्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी दिली.

५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्य स्टॉल्सचे आकर्षण

ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीकरीता राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मैदान, प्लॉट नं. जी-टेक्स्ट ब्लॉक १ ते ४, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई येथे करण्यात आले आहे.

यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि नावीन्य लक्षात घेऊन सहभागींची निवड करण्यात आली आहे. नवोदित महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी  बस सेवा, घरपोच सेवा तसेच दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

४० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा

याआधी नागपूर येथे झालेल्या प्रदर्शनामध्ये १६ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता, तर वाशी येथे २२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ पहिल्या सप्ताहात १५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून, यंदा ४० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi