महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाने ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 10 May 2026
टेक वारी 2.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा
टेक वारी 2.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा
– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 8 : विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित ‘टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभाग सेवा मुख्य अतिरिक्त सचिव व्ही. राधा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जन सेवा कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात
जन सेवा कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, सुधारित ग्राहक सेवा तसेच अत्याधुनिक डिजिटल सेवा प्रणालीची उभारणी करण्यात आली आहे. १९३२-३३ मध्ये स्थापन झालेल्या अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिसला आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम सेवा व्यवस्था आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेऊन नव्याने विकसित करण्यात आले आहे.
पारंपरिक पोस्ट ऑफिसचे रूपांतर आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्रित सेवा केंद्रांमध्ये करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कार्यक्रमादरम्यान अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिस परिसरात लोकार्पण, स्मृतिफलक अनावरण, तसेच आधार सेवा केंद्राची पाहणी करण्यात आली . त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात विशेष दृकश्राव्य सादरीकरण तसेच ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले
पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला
पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला
-केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, गाव असो वा शहर, प्रत्येक कुटुंबाच्या मनामध्ये पोस्टमनबद्दल विशेष आत्मीयता आहे. देशातील दीड लाख पोस्ट कार्यालयांमार्फत सेवा देताना पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला आहे. पोस्ट लाईफ इन्शुरन्समध्ये दीड कोटी खाती आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून पोस्ट बँकेत ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या माध्यमातून पोस्ट विभागाने जनतेचा मोठा विश्वास संपादन केला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वारसा जपत पोस्ट विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री शिंदे यांनी २००७ साली राज्यमंत्री असताना पोस्टमनच्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केल्याची आठवण सांगितली. ‘नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस’ संकल्पनेतून देशभरात सुमारे १०० पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले असून कॅफे, वाय-फाय, इंटरनेट, आरएफआयडी, आधार सुविधा अशा विविध सेवा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ‘जनसेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत देशभरात २५ हजार पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
२४ तासांत स्पीड पोस्ट डिलिव्हरी, आरएफआयडी आणि भविष्यवेधी सेवांमुळे खाजगी स्पर्धेतही पोस्ट विभाग सक्षमपणे उभा राहत असून पोस्टमनपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या परिश्रमातून २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधीयात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत
ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया येथे तीर्थदर्शनाची संधी
मुंबई दि.०८ : मुंबई शहर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई शहर सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे वय किमान ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तथापि, आधार उपलब्ध नसल्यास अन्य वैध ओळखपत्र देखील स्वीकारले जाणार आहे. तसेच अर्जदार शिधापत्रिका धारक असावा आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे.
या यात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी २० मे २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000
टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग · विविध नृत्याविष्कार सादर
टेक-वारी २.० अंतर्गत संस्कृतीरंग
· विविध नृत्याविष्कार सादर
मुंबई, दि. ८ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या दिवशी संस्कृतीरंग कार्यक्रमातून विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
दि. ४ ते ८ मे २०२६ या कालावधीत ‘टेक- वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रम झाला. शेवटच्या दिवशी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. संध्या पुरेचा संगीत नाटक अकादमीच्या टीमने संस्कृतीरंग कार्यक्रम सादर करून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची दाद मिळवली. कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, महाराष्ट्र सदन नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मिनाक्षी अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात गणेशवंदन, शास्त्रीय संगीत नृत्य, ओडिसी, भरतनाट्यम, शिवस्तुती, बाल्या, पंढरपूर वारी यासह विविध अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, भावविश्व आणि कलात्मकता प्रभावीपणे उलगडण्यात आली.
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक जाहीर 8 मे पर्यंत सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांची नोंदणी
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक जाहीर
- 8 मे पर्यंत सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई, दि. 8 : राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, 8 मे 2026 पर्यंत एकूण सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग- 1 भरून नोंदणी केली आहे.
इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शून्य फेरी मध्ये 8 ते 20 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करणे, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे, हरकती/ दुरुस्ती मागण्या, सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे, विविध कोट्यासाठी यादी देऊन रिक्त जागा प्रत्यार्पित करणे तसेच पहिल्या फेरीकरीता जागा प्रदर्शित करणे ही प्रक्रिया होईल.
नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅप फेरी-1 ची अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मे दरम्यान पार पडणार असून, 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असून, एसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.
प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून, 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून, 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...