Tuesday, 28 April 2026

प्रत्येक व्यावसायिक वाहन चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक

 प्रत्येक व्यावसायिक वाहन चालकाला व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक

— परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २७  : महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक आहेयावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावेअसे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

 

मंत्रालयातील  आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरकामगार नेते शशांक रावसंजय निरुपमहजी अराफत शेख तसेच विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मंत्री सरनाईक म्हणाले कीमहाराष्ट्र हे प्रगत राज्य असून रोजगारनिर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावायासाठी अमराठी चालकांनी ती शिकणे आवश्यक आहे.

 

‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

 मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

·         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुले आता अवकाशाच्या दिशेने

·         59 ग्रामीण विद्यार्थ्यांची  'इस्रोसफर

 

ठाणेदि. 27 : जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या मिशन भरारी’ या उपक्रमातून ग्रामीण ते अवकाश’ हे व्हिजन प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. या शैक्षणिक सहलीला सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवनठाणे येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पोलीस दलाचे दैनंदिन कार्य अत्यंत आव्हानात्मक असून अशा क्रीडा स्पर्धांमुळे फिटनेस, कौशल्य आणि संघभावना वृद्धिंगत

 पोलीस दलाचे दैनंदिन कार्य अत्यंत आव्हानात्मक असून अशा क्रीडा स्पर्धांमुळे फिटनेसकौशल्य आणि संघभावना वृद्धिंगत होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दल सातत्याने उज्ज्वल कामगिरी करत आहे. अत्यंत उष्ण वातावरणातही स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुंबई पोलीस व आयोजकांचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौतुक केले. खेळामध्ये जिंकणे-हरणे यापेक्षा खेळाडूवृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे सांगत सर्व सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

स्पर्धांमध्ये यजमान मुंबई संघाने पुरुष व महिला गटात उत्कृष्ट संघाचा किताब पटकावला. उपविजेत्या संघासह वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीचिन्ह देऊन अभिनंदन केले. १०० मीटर महिला स्पर्धेत पुणे शहरच्या निकिता संदीप खताळ आणि १०० मीटर पुरुष स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या चैतन्य संतोष मरडे यांनी नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल विशेष कौतुक केले.

 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक अपर मुख्य पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी केले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आभार मानले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातील खेळाडूंनी दिमाखदार संचलन सादर केले. यास पोलीस बँडची सुरेल संगीत साथ होती.


संविधानिक नैतिकता जपणे आणि राजकारणाचे अपगुन्हेगारीकरण साध्य करण्याच्या दृष्टीने

संविधानिक नैतिकता जपणे आणि राजकारणाचे अपगुन्हेगारीकरण साध्य करण्याच्या दृष्टीने समितीने दिल्लीबाहेरही बैठक घेण्याचा निर्णय घेतला असूनत्या अनुषंगाने समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह आणि विधि व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारीन्यायिक संस्था व विधिज्ञ संघटनांचे मत प्रत्यक्ष ऐकण्यासाठी बैठक घेतली. २९ एप्रिल २०२६ रोजी भुवनेश्वर येथे जाऊन ओडिशा सरकार आणि तेथील संस्थांकडूनही समिती मते जाणून घेणार असल्याचे सारंगी यांनी सांगितले.

जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम

 जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम

 

·         किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यात राज्याची यशस्वी वाटचाल

 

             मुंबई,दि. 24 - राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येणार आहे.  हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन हिवतापविरोधी उपाययोजनांच्या अंमलबजावणी मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने  दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपक्रमांमधून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याने किटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवून सन २०३० पर्यंत टप्प्या-टप्प्याने हिवताप दुरीकरणाकडे राज्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी हिवताप दुरिकरण (२०१६- २०३०) हे उद्दिष्ट साध्य करणेकरिता हिवताप दुरिकरण मोहीम हा कार्यक्रम राबविला जात आहे.  वर्ष २०३० पर्यंत हिवताप दुरिकरण करणे हे ध्येय आहे. त्याअनुषंगाने राज्याने २१ डिसेंबर २०२१ रोजी हिवताप रोग अधिसूचित केला आहे.

         हिवताप समस्याग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डास नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गांवामध्ये किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारीआरोग्य सेविकाआशा यांच्यामार्फत मोहीम राबविली जात आहे. राज्यात सन २०२५ मध्ये २३,२४७ हिवतापबाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या वर्षी 2एप्रिल २०२६ अखेर २,७२० हिवताप बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 236 रुग्ण हे imported (बाहेरून आलेले - स्थानिक नसलेले) आहेत.

        हिवताप प्रतिरोध महिना जून - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जूनमध्ये हिवताप प्रतिरोध महिना विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवामध्ये जनतेमध्ये किटकजन्य आजारांविषयी विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येते.

 

सन २०२३ पासून राज्याची वर्षनिहाय हिवताप परिस्थिती-

 

वर्ष

हिवताप रुग्ण

पी.एफ. रुग्ण

हिवतापाने मृत्यू

पी.एफ. %

२०२३

१६१५९

६२९७

१९

३९

२०२४

२१०७९

८८३१

२६

४२

२०२५

२२८३८

८४८८

२८

३७

(२१ एप्रिल २०२६ अखेर)

२७२०

६३४

२३

 

 

 

 

 

 

 

 

 

राज्यात सर्वाधिक हिवताप रुग्ण असलेले जिल्हे आणि मनपा पुढीलप्रमाणे-

(जानेवारी २०२६ ते २१ एप्रिल २०२६ अखेर)

 

जिल्हे

मनपा

जिल्हा

रुग्ण

मृत्यू

मनपा

रुग्ण

मृत्यू

गडचिरोली

३४८

बृहन्मुंबई

१७७३

रायगड

७६

ठाणे

१३२

सिंधुदुर्ग

२५

पनवेल

१०४

सातारा

१८

कल्याण

२८

रत्नागिरी

१७

मिरा भाईंदर

२८

चंद्रपूर

१४

वसई विरार

२१

          

             हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतुपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती प्रामुख्याने आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून त्यामुळे मेंदूचा हिवताप होवून रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दुषित अनॉफेलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो.

हिवतापाची प्रमुख लक्षणे व दुष्परिणाम -

          हिवतापाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या  पेशीमध्ये त्यांची वाढ होते तेथे त्यांचे जीवन चक्र पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर जेव्हा वरील रोगजंतू रक्त प्रवाहात मिसळून रक्तातील तांबड्या पेशींवर हल्ला करतात त्या रोगजंतूंना मारण्यासाठी रुग्णाचे शरीराचे तापमान खूप वाढते त्यामुळे त्याला खूप थंडी वाजून येते,  रुग्णास मळमळल्यासारखे वाटते, काही वेळेस उलट्या होतात, खूप डोके दुखते नंतर भरपूर घाम येऊन ताप उतरतो व गाडी झोप लागते.  पुन्हा 24 तासानंतर ताप येऊन वरील प्रमाणे त्रास होतो. खूप अशक्तपणा जाणवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते. गर्भवती व बालकांना हिवतापापासून सर्वाधिक धोका संभवतो विशेषता प्लाझमोडियम  फॅल्सिपेरम या जंतूमुळे होणारा हिवताप हा मेंदूज्वर होण्यास कारणीभूत ठरतो व तो अत्यंत जीवघेणा मानला जातो. वेळीच समूळ उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.

उपाययोजना - हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करणे व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करून हिवतापाला आळा घालण्यासाठी प्रथमता दोन गोष्टी अंमल अमलात आणावयास हव्यात एक म्हणजे डासांवर नियंत्रण व हिवतापाने बाधित झालेल्या रुग्णास समूळ  उपचार देऊन रोगजंतूंचा समूळ नायनाट करणे .

डास नियंत्रणासाठी उपाययोजना - किटकनाशक फवारणी - हिवताप पारेषण काळात राज्यातील ग्रामीण भागातील हिवतापासाठी अति संवेदनशील निवडक व उद्रेक ग्रस्त गावांमध्ये सिंथेटिक पायथ्रॉइड गटातील किटकनाशकाची घरोघरी फवारणी.

            अळीनाशक फवारणी - राज्यात नागरी हिवताप योजनेअंतर्गत शहरातील  डासोत्पत्ती स्थानांवर प्रत्येक आठवड्याला अळी नाशकाची फवारणी

            जीवशास्त्रीय उपाययोजना -किटकनाशकामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करून राज्यांमध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात येतात.  सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येतात. किटकनाशक भारित मच्छरदाण्या राज्यात हिवताप संवेदनशील निवडक गावांमध्ये मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात येते.

00000

Monday, 27 April 2026

जन आरोग्य समिती (JAS)” व “रुग्ण कल्याण समिती (RKS)” या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित

 त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती (JAS) व रुग्ण कल्याण समिती (RKS) या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवासेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.

ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून  ग्रामपंचायत सरपंचग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला)बचत गटतरुण मंडळवन सुरक्षा समितीमहिला मंडळ,  सामाजिक संस्थागरोदर व स्तनदा मातातीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्‍य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण  यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षित आहे.

शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याणसामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत "जन आरोग्य समिती" कार्यरत आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंचग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC) अध्यक्ष/महिला सदस्य,  महिला बचत गट अध्यक्ष,  शालेय आरोग्यदूतयुवाकेंद्र युवा  प्रतिनिधीक्षयरोगमुक्त नागरिकतसेच एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश अपेक्षित आहे.

आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे सार्वजनिक आरोग्य मंत्री

 आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे

पुनरुज्जीवन करावे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुबई दि .२६राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून  देण्यासाठी कार्यरत असलेल्यारुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS),  ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे.  सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी यासर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी दिले .

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने  ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या सर्व लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्वाची असते.

ग्रामीण भागासाठी ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC)”  व शहरी भागासाठी महिला आरोग्य समिती (MAS) कार्यरत आहे.  या समित्या स्वच्छतापोषणपाणीपुरवठातसेच प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात महत्वाची भूमिका  बजावत असतात.

त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती (JAS) व रुग्ण कल्याण समिती (RKS) या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवासेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.

ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून  ग्रामपंचायत सरपंचग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला)बचत गटतरुण मंडळवन सुरक्षा समितीमहिला मंडळ,  सामाजिक संस्थागरोदर व स्तनदा मातातीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्‍य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण  यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षित आहे.

शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याणसामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.

Featured post

Lakshvedhi