Monday, 20 April 2026

Shareholder Agreement between MMRDA and Raigad–Pen Growth Center in the presence of Chief Minister Devendra Fadnavis

 Shareholder Agreement between MMRDA and Raigad–Pen Growth Center in the presence of Chief Minister Devendra Fadnavis

Mumbai, April 18: A shareholder agreement was signed between MMRDA and Raigad–Pen Growth Center in the presence of Chief Minister Devendra Fadnavis.

The event took place at Sahyadri State Guest House and was attended by Metropolitan Commissioner Dr. Sanjay Mukherjee, Additional Chief Secretary (Energy) Abha Shukla, Additional Chief Secretary to the Chief Minister Lokesh Chandra, Principal Secretary Dr. Shrikar Pardeshi, Industries Principal Secretary P. Anbalagan, Managing Director Vijay Singhal, Investment & Policy Advisor to CM Kaustubh Dhavse, and Nikhil Gandhi of Orange City Group.

Key Features of the Agreement:

  • Development of Raigad–Pen Growth Center Ltd.
  • Proposal for an integrated township policy
  • Development as a smart city
  • Expansion in Pen taluka of Raigad district
  • Connectivity to major port areas
  • Self-reliant (self-sustained) township

20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

 

मुंबईदि. 18 : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर)खानदेशमराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाटपाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरतसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेतज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र 22 तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे कीसंभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी:

 शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत

 काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत

 वादळी वारेपाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

 शेतमालभाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी

 एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नामांकित विद्यापीठे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुक

·         प्रकल्पासाठी जागा त्वरित उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देश

 

मुंबई, दि 18 : एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याने संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्राप्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीएज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी यासंदर्भात उत्सुकता दर्शवली असल्याने या नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश

 पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता

राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

 

मुंबईदि. २४ : पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईनफायनान्सबिल्टऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले

केंद्र शासनाकडून साखर उद्योगाला

 केंद्र शासनाकडून साखर उद्योगाला आवश्यक ते सहाकार्यसवलती मिळण्याच्या दृष्टीने साखर कारखाना संघाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत तातडीने केंद्र शासनासोबत बैठकीची वेळ घेऊन चर्चा करण्यात येईल. राज्य शासनासोबतच केंद्राकडून ही साखर कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सहाय्य मिळवण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्न करेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता येत्या गाळप हंगामाची व्यापक प्रमाणात सुरवात होण्याच्या दृष्टीने साखर कारखान्यांना शक्य ते आर्थिक  सहाय्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी मुख्य सचिवांनी राज्यस्तरीय समितीचे गठन करावेत्यामध्ये सहकारकृषीवित्त विभागाचे सचिवसाखर आयुक्तउद्योग सचिव आणि राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश करावा. या समितीने तातडीने साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणीसमस्यांचे स्वरुपत्याच्या निवारणाचे उपायपर्यायी व्यवस्था या अनुषंगाने सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्याच्या माध्यमातून साखर उद्योगासाठीचे पॅकेज राज्य शासनास करता येईल. तसेच मोठ्या गुळ व खांडसारी प्रकल्पांकरिता राज्य शासनाची नियमन प्रणाली असणे आवश्यक आहे. यासाठीची नियमावली तयार करावी त्याचा मसुदा येत्या पंधरा दिवसात सादर करावा. साखर कारखान्यांच्या अडचणी दूर करुन साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक भूमिकेत आहे.

Sunday, 19 April 2026

मित्रा'आणि ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात ५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार

 'मित्रा'आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात

५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार

 

मुंबईदि. १८ : महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था आलेल्या  महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून  राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे.

पृथ्वी दिन २०२६ निमित्ताने करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत विकासाची चौकट मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकसंस्था आणि उद्योगांना हरित भविष्यासाठी एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या भागीदारीत MITRA संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ दिले जाणार असूनअर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणीजनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

या सहकार्यांतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार

 मिशन लाइफ (Mission LiFE): नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्यव्यापी आराखडा

सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज: ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी उत्तरदायित्व निश्चित करणे

आर्टिस्ट फॉर द अर्थ: हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

 मुंबईला सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनवणे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक स्तरावर शाश्वत कार्यक्रमांचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न

Featured post

Lakshvedhi